घुबड

केशवसुत

श्यामा राणी गभीर रजनी

अलंकता जी नक्षत्रगणी

वेवर आपुले उंच धरोनी

बसुनी राज्यासनी दरारा दावित आहे जो फार,

समोरच्या चिंचेवरूनी तो

घुबड तियेचा बन्दीजन तो

घूघ - घूघू - महिमा तीचा वर्णी करूनी घूत्कार! १


कवी आपुल्या खिडकीमधुनी

बाहेर बघे शून्य लोचनी;

स्तब्धत्व जनी, स्तब्धत्व वनी

मनीहि दयितानिदधने वागे स्तब्ध निराशा अनिवार

अवघड झाले एकलेपणे;

परि त्या तरूवरूनी घुबडाने

“*, मी तुज सोबत!* म्हटले, घूघू करूनी धूत्कार! र


खाशी सोबत!” कवी म्हणाला,

माझ्या विरहव्यथित मनाला

वाटे मनुजांचा कंटाळा,

दुःख करित बैसणे आवडे, जेथे राहे अंधार;

हा मित्र मला भला मिळाला

धीर मदीय मना द्यायाला.”

ऊहृ ऊह!” उत्तर दिधले त्याने करूनी धूत्कार! 3


नाही? धीर न देशिल काय

शोके मी मोकलिता धाय?

ओढवले की अद्ष्ट हाय!

गुणरूपवती प्रिया निमाली! झाले सारे निस्सार -


विलाप ऐसे ऐकुनि माझे

द्रवेल काय न बा हृदय तुझे?”

ऊहृ ऊह!” उत्तर बोले त्याचा भेसुर धूत्कार! 


हे अप्रतिमे! प्रिये! अप्रियतमे!

तुजवीण जिणे निर्माल्य गमे!

अहह! वेढिले असे मज तमे!

मरून तर मी, जेथ वसे ती दिवंगता दिव्याकार,


तेथ पूजिली सुरांगनांनी

पाहिन काय न सखी स्वनयनी

ऊहृ ऊह!” बोले निष्ठुर त्या घुबडाचा धूत्कार! 


बरे, बरे! मी नरकी जाडून

घोर यातना तेथिल सोशिन

खेद न त्यांचा अगदी मानिन,

जर त्या स्थानी वागेल मनी कान्तेचा पुण्याकार;


तेथ तियेचे द्याया दर्शन

स्मृति मम समर्थ होडल काय न?”

ऊहू - घूघू!” बोले निर्घृण त्या दगडाचा धूत्कार! ६


जा निघ येथुनि! मला रडू दे,

शोके माझे हृदय कठू दे!

कानी परि तव रव न पडू दे,

जो मम खिन्नपणावरि लादी निर्विण्णपणाचा भार!


डाग न देहृू मम दुःखावर,

काळे कर तू येथुनि सत्वर!”

घुघू - ऊह!” दे प्रत्युत्तर त्या अधमाचा धूत्कार! 


निशीथसमयी या अंधारी

वेताळाची मिरवे स्वारी,

पाजळुनिया टेंभे सारी

भुते नाचती भयानकपणे! चित्ती उपजविती घोर!


नैराश्ये मज पुरे घेरिले,

खिडकीपुढुनी घुबड न हाले,

घूघू! घूघ्‌! चाले त्याचा घूघू भीषण धूत्कार!


#घुबड #Keshavsut  #केशवसुत  #मराठी कविता 


Comments