सिंहावलोकन

केशवसुत

मुखा फिरवुनी जरा वळनि पाहता मागुती

कितीक हदये वदा! चरकल्याविणे राहती?

नको वळुनि पाहणे' म्हणुनि दग जरी आवरू,

धुके पुढिल जाणुनी मन न घे तसेही करू!


प्रदेश किति मागुते रूचिर ते वरे टाकिले,

कितीक तटिनीतटे श्रम जिथे अम्ही वारिले;

किती स्मृतिस धन्यतास्पद वनस्थल्ी राहिल्या,

जिथे धवलरिता निशा प्रियजनांसवे भोगिल्या.


सुखे न मिळतील ती फिरूनि! -ती जरी लाविती

मनाला चटका, तरी नयन त्यांवरी लोभती;

परंतु ह॒दयास जे त्वरित जाउनी झोंबती,

प्रमाद दिसता असे नयन हे मिटू पाहती.


किती घसरलो! किती चुकुनि शब्द ते बोललो!

करूनि भलते किती पतित हंत! हे जाहलो!

स्वयं बहकुनी उगा स्वजनमानसे टोचिली!

वृथा स्वजनलोचनी अहह! आसवे आणिली!


चुकोनि घडले चुको! परि, 'असे नव्हे हे बरे'

वदनिहि कितीकदा निजकरेचि केले बरे!

म्हणूनिच अम्हांपुढें घनतमिस्त्र सारे दिसे,

पुढे उचलण्या पदा धति मुळीहि आम्हां नसे


चुकी भरूनि काढणे फिरूनि, हे घडेना कधी',

विनिष्ठर असे भरे प्रगट तत्त्व चित्तामधी!

म्हणूनि अनिवार हे नयनवारि जे वाहते,

असे अहह! शक्त का कणवही टिपायास ते?

Keshavsut


Simhaavlokan, सिंहावलोकन
#

Comments