विद्यार्थ्याप्रत

 

केशवसुत
महत्त्व भारी आहे या पृथ्वीचे,

त्याहनि अतिशय या सगळ्या विश्वाचे;

परि तुजमध्ये महतीचे जे बीज

त्याहनि काही मोठी नाही चीज!-

ठसव मनी हे साचे,

बाबा!

हे वच बह मोलाचे.


अग्नि असे हा तेजस्वी रे फार,

त्याहनि भारी सूर्य नभीचा थोर;

परी किरण जो तुजमध्ये सत्याचा

प्रकाश सर्वोत्तम तो आहे त्याचा-

घोक सदा हे वाचे

बाबा!

हे वच बह मोलाचे.


पृथ्वीमध्ये रत्ने बहु आहेत,

आकाशी तर असंख्य दिसताहेत,

परि एक रत्न तुजमध्ये जे सच्छी:

कोणाला नच सर त्याची येईल –

स्मरण असू दे याचे

बाबा!

हे वच बहु मोलाचे.


स्नायूमध्ये पुष्कळ आहे शक्ति,

नृपवेत्री तर फारच आहे म्हणती;

परि एक एक जो नवा शब्द तू शिकसी

शक्ति तयाची उलथिल सर्व जगासी!

पठन तर करी त्याचे

बाबा!

जग हे बदलायाचे.



# विद्यार्थ्याप्रत  #Keshavsut  #केशवसुत  #मराठी कविता 

Comments