केशवसुत |
“कुठे जाशी?” - “शर्करा प्यावयाला;
अमुक पंताला पुत्र असे झाला;
म्हणुनि आता इृष्टांस वाटण्यास
हवी आहे शर्करा बह. त्यास.”
“कुठे जाशी तू?” -“फुले आणण्याते;
तमुक रावाच्या असे लग्न येथे.
वधुवरांला त्या गळा घालण्याला,
करायाच्या आहेत तेय माळा.”
“आणि कोठे तू?”-“नविन पसारा तो
संसृतीचा मांडीत आज आहे;
म्हणुनि बाजारा करायास जातो -
घरी जिवलग ती वाट बघत आहे!”
“आणि त् रे?”- “जातसे आणण्यासी
वैद्यबोवाला, अमुक वृध्द यासी
वायु झालाहे” - “जा परेत - वस्त्रे
विकत घेउनि शोध तू गोवऱ्या रे!”
पुढुनि दिसते मग मठे एक येता
“कुठे बाबा जातोस सांग आता?”
हवेतुनि हे पडतात शब्द पाही
“कुठे जातो हे मला कळत नाही!”#कोठे जातोस? #Keshavsut #केशवसुत #मराठी कविता
Comments
Post a Comment