केशवसुत |
मी एकला फिरतसे बहवार रानी,
यालागुनी न समजा मजला अडाणी;
आराधुनी विपिनदैवत मी तिथूनी
त्याची प्रसादवचने मनुजांस आणी.
पाहून निर्झर उरी कर वेंगुनीया
मी ठाकतो, परि न मंद म्हणा जना या.
प्रत्येक मेघ वरता फिरता नभात
एकेक शब्द लिहितो मम पुस्तकात !
पुष्पे वनात कसली खुडितो फिरोन !
उद्योगमग्न जन हो ! मज हे म्हणा न,
नक्षत्रसे सुम मदीय करातले ते
सत्क््ल््सिप्रित असे सदनास येते !
पुष्पामधे प्रकट होउन जे जराही
सृष्टीत एकहि रहस्य असे न काही;
ज्याचा ध्वनी न उमटे खगकूजितात
नाही निगूढ इतिहास असा जगात !
शेतामधूनि सदनाप्रत पीक एक
नेतात पुष्ट बलिवद तुझे सुरेख,
तूझी जमीन दुसरे मज पीक देते.
काव्यात साठवुनि ठेवितसे पहा ते !
#Shrushti ani Kavi #Keshavsut #केशवसुत #मराठी कविता
Comments
Post a Comment