दर कोठे एकला जाउनीया

केशवसुत

दर कोठे एकला जाउनीया,

एकतारी आपुली घेउनीया,

स्वेच्छ होतो छेडीत ती, मनाला

दुःखिताला आराम व्हावयाला.


आजवेरी बह मनोभंग झाले,

बहत आशांचे प्राण निघुनि गेले.

तया शोचाया निर्जनात जावे,

एकतारी छेडीत मी बसावे !


आजदेखिल मी तसा अस्तमानी

वाद्य वेडवाकुडे वाजवूनी

दंग झालो स्वच्छंद गायनाने;

खरे संगीतज्ञान कोण जाणे !


हृदय आत्म्याला जधी खेळवीते,

हृदय आत्म्याला जधी आळवीते,

तधी तुमचे ते नको कलाज्ञान

तधी हृदयासम नसे तानसेन !


असो; असता मन गायनात लीन

रात्र झाल्याचे भान राहिले न;

जसे कल्रहंसा वाहता प्रवाही

प्रास मरणाचे ज्ञान नसे काही !


अहा ! अदभ्रुत तो काय एक झाले -

धन्य बन्धो!” हे शब्द वरूनि आले!

वरी बघता तारका उंच आहे,

सदय सस्मित मजकडे वरूनि पाहे,


*कवे! बन्धो!' ती वदे नभातून

तुझी गीते परिसूनि मी प्रसन्न;

स्वसा आतापासून समज माते

बन्धु माझा तू, मंगल हे नाते!*

प्रसादे त्या वाकता, काजव्याचे

स्फुरण खाली बघुनि म्हणे, याचे

साम्य काहीतरि असे तुशी तारे!'

माझिया तर जीविती तिमिर सारे!'


नको ऐसे रे वदू बन्धुराया!'

म्हणुनि लागे ती मला आश्वसाया;

तुझ्या दिव्यत्वापुढे जग भिकारी;

कासया ही खिन्नता? दर सारी!


अशा भगिनीचा लाभ मला झाला;

खेद गेला, आनंद मनी आला;

तिचा आभारी, दुवा देत तीते,

समाधानी मी पातलो घराते!



# दर कोठे एकला जाउनीया  #Keshavsut  #केशवसुत  #मराठी कविता 

Comments