केशवसुत |
स्वहदय फाडइनि निजनखरी
चिवट तयाचे दोर
काढुनि गोफण वळितो ही
सत्वाचा मी चोर!
त्वेषाचा त्या दोराला
घट्ट भरूनिया पीळ
गाठ मारितो वैराची
जी न पीळ दवडील!
वैर तयांला बसती जे
स्तिमितचि आलस्यात,
वैर तयांला, पोकळ जे
बडबडती तोऱ्यात!
वैर तयांला, वैरी जे
त्यांच्या पायधुळीत
लोळुनि कतार्थ होती जे
प्रास तूपपोळीत!
वैर तयांला, पूर्वीच्या
आर्यांचा बडिवार
गाउनि जे निज षंढत्वा
मात्र दाविती फार!
वैर तयांला, थप्पड बसता
चोळिति जे गालास,
वैर तयांला, जे गरिबी
शिकवितात बालांस!
गाठ मारूनी वैराची
गोफण केली छान;
कठिण शब्द या धोंडयांनी
करितो हाणाहाण
Comments
Post a Comment