शब्दांनो! मागुते या!

केशवसुत

तेजाचे पंख वाऱ्यावरि हलवित ती चालली शब्दपंक्ति,

देव्हारा शारदेचा उचलुनि गगनातूनि तो नेत होती;

शब्दांही चित्तभरमी विकसित हिरवी तो मदीया बघूनी

देव्हारा माझिया तो उत्तरूनि हृदयी स्थापिला गौरवूनी.


शब्दांसंगे तदा मी निजह॒दयवनामाजि संचार केला,

तेथे मी कल्पपुष्पे खुडइुनि नमुनि ती वाहिली शारदेला.

शब्दांच्या कूजिताने सहजचि मम हृत्प्रांत गुंगूनि गेला;

मी त्या स्वप्नात गयग्रथित जग मुळी लोटिले तुच्छतेला.


रागाने या जगाने अहह! म्हणुनिया शापिले या जनाला

तेणे चिंताग्नि माझी हृदयहरितता नाशिता फार झाला.

गाणारे शब्द सारे झडकरि उडुनी दर देशास गेले,

वाग्देवीपीठ येथे परि मम हृदयी दिव्य ते राहियेले.


वाग्देवी शारदे गे! फिरवुनि अपुले शब्द पाचार येथे;

साहाय्यावीण त्यांच्या भजन तव कसे सांग साधेल माते?

आशामेघालरि चिंतानल अजि विझवू जाहलीसे तयार,

शब्दांनो, मागुते या; बहर मम मनी नूल्र येईल फार!



# शब्दांनो! मागुते या!  #Keshavsut  #केशवसुत  #मराठी कविता 


Comments