पद्यपंक्ति

केशवसुत

आम्ही नव्हतो अमुचे बाप

उगाच का मग पश्चाताप?

आसवे न आणू नयनी,

मरून जाऊ एक दिनी!


अमुचा पेल्रा दुःखाचा,

डोळे मिटुनी प्यायाचा;

पिता बुडाशी गाळ दिसे,

त्या अनुभव हे नाव असे!

फेकुनि द्या तो जगावरी;

अमृत होउ तो कुणातरी.


जे शिकलो शाळेमाजी

अध्याहत ही टीप तया -

द्वितीय पुरूषी हे योजी,

प्रथम पुरूष तो सोडुनिया!”



# पद्यपंक्ति  #Keshavsut  #केशवसुत  #मराठी कविता 

Comments