स्वर्ग, पृथ्वी आणि मनुष्य

केशवसुत

आरंभी, म्हणजे मनुष्य नव्हता तेव्हा, क्षितीपासुनी

होता स्वर्ग न फार दूर; अपुल्या कांतिप्रसन्नेक्षणी


तो प॒थ्वीप्रत सौख्य नित्य वितरी, तेव्हा पुढे त्यावरी

गेली प्रीति जडून गंधवतिचे चित्तात भारी खरी.


निर्मीला नर नन्तर स्वतनुच्या तीने मळीपासुनी

इच्छा आपुलिया धरून हृदयी ही - गायने गाउनी


स्वर्ग आळवुनी नरे सुकुशले मोहनिया टाकिजे,

स्वर्गे येऊनि खालती मग तिशी प्रेमे सदा राहिजे.


या दुष्टे पण मानवे स्वजनना-पृथ्वीस ताइडूनिया

लाथेने, अपुल्या मनी अवथिले स्वर्गावरी जावया;


ती पाहूनि कृतघ्नता निज मनी तो स्वर्ग जो कोपला,

आवेशात उडूनि दरवर तो जाता तधी जाहला.


तेव्हापासुनि ही धरा झुरतेस; माते! चुकी जाहली!

स्वर्गा! तूहि अम्हा क्षमस्व सदया! ये खालता भरूतली -


ये बा! आणि या धरेस अगदी देऊ नको अंतर!

आहे तूजवरी तसेच बसले स्वर्गा! तिचे अंतर.




# स्वर्ग, पृथ्वी आणि मनुष्य  #Keshavsut  #केशवसुत  #मराठी कविता 


Comments