तत्त्वतः बघता नामावेगळा

केशवसुत

तत्त्वतः बघता नामावेगळा

कोण नाही सांगा मजला!


भिन्नव्यक्तित्व नामाला;

नामकरण होतसे.


नाम म्हणजे अभिधान

अभिधान म्हणजे ते वरून


धारण केले, ज्यामधून

अंतःसाक्ष पटतसे.


भाव शब्दस्पर्शहीन

तैसे रूपरसगंधांवाचुन;


अतएव ते विषय जाण

इन्द्रियांचे नव्हेत.


हो तो वाणी मिथ्या वाटे,

कारण, पंचविषयांचे थाट


भाव नटती, खरेखोटे

विचारूनी पाहिजे.


# तत्त्वतः बघता नामावेगळा  #Keshavsut  #केशवसुत  #मराठी कविता 


Comments