स्फुट विचार

केशवसुत
विश्वाचा विस्तार केवढा?

ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा


सष्टिकेद्र तो कवठया ठायी

ज्याच्या त्याच्या आहे हृदयी


स्वीकरणीय जनी करिते जे -

दातव्या, ती कला जाणिजे.


काय निराशा असे बरे? -

बुजगबाहले जगातले;

मूर्ख भिउनिया त्या गेले;

सुज़ बये तद्रप खरे.


स्वये भयापासुनि पळणे,

भयसमयी साहस करिती

त्या अपजय येता हसणे,

हे विकत असे या जगती

शहाणपण या नावाने!


#स्फुट विचार  #Keshavsut  #केशवसुत  #मराठी कविता 

Comments