| केशवसुत |
अशी असावी कविता, फिरून
तशी नसावी कविता, म्हणून
सांगावया कोण तुम्ही कवीला
अहात मोठे, पुसतो तुम्हांला.
युवा तसा तो युवतीस मोहे,
तसा कवी हा कवितेस पाहे;
तिला तसा तो करितो विनंती
तसा हिला हा करितो सुवृत्ती.
लाडीगुडी चालव लाडकीशी
अशा तऱ्हेने, जरि हे युव्याशी
कोणी नसे सांगत, थोर गौरवे
का ते तुम्ही सांगतसा कवीसवे ?
करूनिया काव्य जनात आणणे
न मुख्य हा हेतु तदीय मी म्हणे;
करूनि ते दंग मनात गुंगणे,
तदीय हा सुन्दर हेतु मी म्हणे.
सभारूची पाहनि अल्प-फार
रंगी नटी नाचवि सूत्रधार;
त्याचे तयाला सुख काय होय
ते लोकनिन्दाभयही शिवाय !
नटीपरी त्या कविता तयाची
जनस्तुती जी ह॒दयात याची;
पढीक तीचे परिसून बोल
तुम्ही कितीसे भ्रुलुनी इलाल ?
स्वभावभूविष्ट जिच्यात माधुरी
अशी तुम्हांला कविता रूचे जरी,
कवीस सोडा कवितेबरोबरी,
न जाच वाटेस तयाचिया तरी,
तयाचिया हो | खिडकीचिया उगे
खाल्ली तुम्ही जाउनि हो रहा उभे;
तिच्या तयाच्या मग गोड लीला
ऐकूनि पावाल तुम्ही मुदाला !
#Kavita ani Kavi #Keshavsut #केशवसुत #मराठी कविता
Comments
Post a Comment