रांगोळी घालताना पाहून

केशवसुत

होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,

बालार्के अपुली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर;

तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;

रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.


आधी जे लिहिले तिने रविशशी, नक्षलमाला तदा,

मध्ये स्वस्तिक रेखिले, मग तिने आलेखिले गोष्पदां;

पद्मे, बिल्वदले, फुले, तुळसही, चक्रादिके आयुधे,

देवांची लिहिली, न ते वगळिले जे चिन्ह लोकी सुधे.


होती मंजुळ गीत गात वदनी अस्पष्ट काहीतरी,

गेला दाटुनि शांत तो रस अहा तेणे मदभ्यंतरी;

तीर्थे, देव, सती, मुनी, नरपती, देवी तशा पावना,

अंतदष्टिपुदूनिया सरकल्या, संतोष झाला मना!


चित्रे मी अवलोकिली रूचिर जी, काव्ये तशी चांगली,

त्यांही देखिल न स्मरेच इतुकी मदवृत्ति आनंदली;

लीलेने स्वकरे परंतु चतुरे! त्‌ काठिल्या आकृती,

त्या या पाहुनि रंगली अतिशये आहे मदीया मति.


रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्ये! मला वाटतो,

स्पष्टत्वे इतुक्या अशक्य मिळणे काव्यात, चित्रात तो;

स्वभूसंग असा तयात इतुक्‍्या अल्पावकाशी नसे

कोणी दाखविला अजून सुभगे! जो साधिला तू असे.


आदित्यादिक आकृती सुचविली दिव्यत्व ते उज्ज्वल,

तैसे स्वस्तिक सूचवी सफलता धर्मार्थकामांतिल;

पाविञ्र्याप्रत गोप्पदे, तुळसही, शोभेस ही सारसे

पुष्पे प्रीतिस, चक्र हे सुचविते द्वारी हरी या असे!


तत्त्वे मंगल सर्वही विहरती स्वर्गी तुझ्या या अये!

आर्ये ! तू उपचारिकाच गमसी देवी तयांची स्वये.

नाते, स्नेह, निदान ओळख जरी येथे मला आणिती,

होतो मी तर पाद सेवुनि तुझे रम्य स्थळी या कृती! 


चित्ती कल्मष ज्याचिया वसतसे ऐशा जनालागुनी

या चिन्हांतुनि हा निषेध निघतो आहे गमे मम्मनी -

जा मागे अपुल्या, न दृष्टि कर या द्वाराकडे वाकडी,

पापेच्छूवरि हे सुदर्शन पहा आणील की साकडी!”


आहे निर्मल काय अन्तर तुझे? मांगल्य की जाणसी?

लोभक्षोभजये उदात्त हृदयी व्हायास का इच्छिसी?

ये येथे तर, या शुभाकृति मनी घे साच अभ्यासुनी.”

आर्ये! स्वागत हे निघे सरळ या त्वल्लेखनापासुनी.

साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे,


नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा अंधळे!

रांगोळी बघुनी इतःपर तरी होणे तयी शाहणे,

कोठें स्वर्गसमक्षता प्रगटते हे नेहमी पाहणे!



#  रांगोळी घालताना पाहून  #Keshavsut  #केशवसुत  #मराठी कविता 
#rangoli ghaltana pahun Marathi Kavita,Keshavsut,

Comments