केशवसुत |
संध्याकाळी बघुनि सगळी कान्ति ती पश्चिमेला
वाटे सयःस्थितिच अपुली मर्त ती मन्मनाला;
“हा! हा! श्रीचा दिवस अपुल्या मावळोनी प्रतीचे
गेला! गेला!' सहज पडती शब्द हे मन्मुखाचे.
तेणे माथे फिरूनि सगळे जे म्हणोनि दिसावे,
त्यात्यामध्ये स्वजनकुदशा वाचुनी मी रडावे!
'जे जे चित्ती बहतकरूनी ते सुषुसीत भासे'
वृध्दांचे हे अनवितथ हो वाक्य होईल केॅसे?
प्रातःकाली रवि वरिवरी पाहनी चालताना,
होई मोदातिशय बहधा सर्वदा या जनांना;
पूर्वीची तो स्थिति परि करी व्यक्त ती वाचुनिया
एकाएकी हृदय मम हे जातसे भंगुनीया!
“हा जैसा का रवि चठतसे त्याप्रमाणेच मागे
स्वोत्कर्षाचा रविहि नव्हता वाढता काय? - सांगे;
जावोनी तो परि इथुनिया पश्चिमेशी रमाया,
ऱ्हासाची ही निबिड रजनी पातली ना छळाया!*
वल्लींनो! ही सुबक सुमने काय आम्हांस होत?
युष्मदगाने मधुर, खग हो! या जना काय होत?
आम्हां डोळे नसति बघण्या पारतंत्र्यामुळे हो!
ऐकायाला श्रुतिहि नसती पारतंत्र्यामुळे हो!
आहे आम्हांवर जव निशा पारतंत्र्यांधकारे,
वाहे जो का उलट कुदशेचे तसे फार वारे,
सोौख्याचे तोवरि फुकट ते नाव व्हावे कशाला?
दुःखाचा तोवरि खचित तो भोग आहे अम्हांला!
आनंदाचे समयि मजला पारतंत्र्य स्मरून
वाटे जैसे असुख, तितुके अन्य वेळी गमे न!
पाहोनीया विष जरि गमे उग्र ते आपणाते,
अन्नामध्ये शतपट गमे उग्रसे पाहुनी ते!
देवा! केव्हा परवशपणाची निशा ही सरून
स्वातंत्र्याचा युमणि उदया यावयाचा फिरून?
केव्हा आम्ही सुटुनि सहसा पंजरातूनि, देवा!
राष्ट्रत्वाला फिरूनि अमुचा देश येईल केव्हा?
-Keshvsut
Eka Bhartiyache Udgar , एका भारतीयाचे उदगार
Comments
Post a Comment