निद्रामग्न मुली

केशवसुत

निद्रामग्न मुली! तुझे मुख अहा! हे रम्य आहे किती!

ते साधेपण, नमता, मधुरता, शांती तिथे शोभती!

कौमार्ये नवयोवना न अजुनी थारा दिला वाटते,

स्वर्गातील तरीच मुग्धतरता या त्वन्मुखी राहते.


कोणी येथ जरी मनुष्य नसते, किंवा तुझा हा लय

ब्रह्मानंदनिमग्न - यास नसते नासावयाचे भय,

तूझे कोमल हे कपोल - मधुनी जे भासते हासती,

होतो मी तर त्यांस वत्सलपणे चुंबून बाले! कृती.


ऐसे मी म्हणतो म्हणून ठपका कोणी न ठेवी मला,

का की फारच ओठिते तव गडे! कौमार्ये मददृष्टिला.

यासाठीच तसे वदन चुकलो तूते स्वसा मानुन;

पापेच्छेस शिवाय चोदक नसे देही तुझ्या यौवन.


हा जो मी कवितेत गे ट्रवुनिया गेलो तुला पाहता,

याचे कारण फार भिन्नच असे ते सांगतो मी अता -

ताई गे! तव या अनिश्चित जगी होईल कैशी दशा,

मी शोकाकुल होउनी गठूनिया गेलो विचारी अशा.


थोडयाशा दिवसांमधेच तव हे कोमार्य गे जाइल

लज्जारोधितलोललीचन असे तारूण्य ते येईल;

त्याची फुल्ल विलोकुनी विकसने डोळे दिपूनी तव,

या लोकाविषयी विचार तुजला येतील कैसे नव? --


नाना भोगनियुक्त गोड किति हा संसार आहे बरे?

जन्मापासुनि का तो वितरिला आम्हांवरी ईश्वरे?”

नाना क्‍्लूसि कदाचित तुझ्या चित्तात त्या येतिल

जाताना परि लौकिकानुभव तो तू कायसा नेशिल्र?


ज्या ह्या आज अजाणतेपण असे गाली तुझे शोभते,

ही शोभा अथवा अजाणपण ज्या गाली भले दाविते,

त्या गाली कडु जाणतेपण पुढे ओठील ना नांगर! -

त्या तासांवर जाणतेपण तसे बैसेल ना भेसूर!


ह्या तझ्या मधु रे! मुखी मधुरशा त्या सर्वही भासती

चेतोवत्ति समप्रमाण, न दिसे भारी अशी कोणती;

काहीका दिवशी तुला जर गडे! ठेलो पहाया जरा,

सदवृत्तीसह या तुला फिरूनि मी वाचीन का चेहरा?


राहो हे सगळे, अशी कुळकथा नाही मुळी संपणे,

त्‌ माझी भगिनी! म्हणूनि तुजला आशी असे अर्पिणे -

हे माझे भगिनी! दिनानुदिन गे दुःखे अम्हां घेरिती,

त्यांते हाणुनिया सुखे तुज सदा भेटोत ती राखिती!


निद्रामग्न मुली Keshavsut , केशवसुत , मराठी कविता 

Nidramagn muli Marathi Kavita,Keshavsut,

Comments